आपला नवरा आणि तीन किशोरवयीन मुलांबरोबर एला रुबिनस्टाईन एका सुंदर घरात br> राहत असते. आत्मविश्]वास आणि समाधान वाटावं अशी प्रत्येक गोष्ट तिच्याकडे आहे, तरीदेखील तिच्या जीवनात रिक्तता आहे. कोणे एकेकाळी ही रिक्तता प्रेमाने परिपूर्ण होती, त्यामुळेच तेराव्या शतकातील सूफी कवी रुमी आणि शम्स तब्रीझी व जीवन आणि प्रेमाची त्यांची चाळीस सूत्रं यांबद्दल ती जेव्हा एक हस्तलिखित वाचते, तेव्हा तिला मोठा धक्का बसतो. कुटुंबाकडे पाठ फिरवून ती जीवनप्रवास सुरू करते. त्या हस्तलिखिताच्या गूढ लेखकाचा शोध तिला घ्यायचा असतो. सूफी गूढवाद आणि काव्य यांच्याशी सांगड घालणारा हा शोध काळजाला हात घालत एला समवेत आपल्यालादेखील विश्]वास, श्रद्धा आणि प्रेमाच्या विलक्षण प्रदेशात घेऊन जातो... माहितीपूर्ण, मंत्रमुग्ध करणारं असं हे पुस्तक आहे.