हे पुस्तक म्हणजे सरदार पटेलांच्या कथेचे पुनर्कथन आहे. या पुस्तकात लेखक ताकदीच्या विस्तृत आणि तत्पर किश्शांसह पटेलांचे संघर्षपूर्ण निश्चयी जीवन आणि भारताला सुरक्षित ठेवण्याप्रतीची त्यांची मनःपूर्वक निष्ठा जिवंत करतात. हे करतानाच लेखक भारताच्या इतिहासातील काही सर्वांत करारी लोकांमधील वाद, भांडणे आणि संघर्ष, तसेच स्वतंत्र भारत कोरून काढण्यासाठीचा त्यांचा लढा यांवरही प्रकाश टाकतात. तुरुंगात आणि तुरुंगाबाहेर असतानाही, दशकानुदशकांच्या त्रासांमुळे खालावलेले शरीर जर्जर झालेले असतानाही, अगदी मृत्युशय्येवर असतानाही आपल्या देशाला वाचवण्यासाठी पटेल काम करताना या पुस्तकामध्ये दिसतात. भविष्यातील पिढ्यांसाठी पटेलांचा वारसा नव्याने विषद करण्यासाठीच लेखकाने हे पुस्तक लिहिले आहे.