हे पुस्तक मानवी स्वभावाबद्दलच्या आपल्या गृहीतकांनाच आव्हान देते, त्यामुळे नवीन शक्यतांचे जग आपल्यासमोर खुले होते. माणसं ही मुळातच अत्यंत दुष्ट आणि स्वार्थी असतात, याबद्दलचा उपहासयुक्त दृष्टिकोन बदलायला लावते आणि अधिक तेजस्वी भविष्याचा मार्ग उजळते. या पुस्तकात लेखकाने मानवी स्वभावाचे केलेले पुनर्मूल्यांकन हे प्रत्यक्ष पुराव्यांवर आधारलेले आहे, त्यामुळे मानवी स्वभाव नव्याने समजून घेता येतो. हे पुस्तक निश्]चितच मानवतेकडे नव्या दृष्टिकोनातून पाहण्याकरिता सर्वांना उन्नत करणारे आहे.