अर्थशास्त्र विषयाच्या जिज्ञासूंमध्ये मराठी माध्यमाचा अवलंब करणार्]या अभ्यासकांचा वर्ग पुष्कळच वाढलेला आहे. कनिष्ठ महाविद्यालयीन, पदवीपूर्व, पदवीचे तसेच पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी, त्यांना शिकविणारा अध्यापक-वर्ग, मराठीतून विषय संशोधन करणारे, स्पर्धा परीक्षांमध्ये मराठीतून (मातृभाषेतून) परीक्षा देणारे स्पर्धक, आंतरराष्ट्रीय अभ्यास करणारे, इंग्रजीतील माहितीचा अनुवाद करू पाहणारे अनुवादक आणि अगदी दैनंदिन व्यवहारात अर्थशास्त्र विषयाचे वाचन करणारे सर्वसाधारण वाचक या सर्वांनाच हा शब्दकोश उपयुक्त ठरेल अशी आशा आहे. १५०० हून अधिक शब्दसमूहांचा कोशात समावेश. संक्षिप्त इंग्लिश व विस्तृत संज्ञा मराठी नावासह. विविध देशांची चलने. अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेत्यांचा समावेश. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपासून सामान्य वाचाकांपर्यंत सर्वदूर. संदर्भमूल्य असलेला शब्दसंग्रह. मराठी माध्यमातून उच्च शिक्षण व संशोधन करणार्]यांना अत्यंत उपयुक्त.